काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

नवी देहली – उत्तरदायित्व आणि शैक्षणिक सुधारणा यांची मागणी करणार्या विद्यार्थ्यांना भविष्यातील योग्य हितधारक म्हणून मान्यता देण्याऐवजी मोदी सरकार त्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते. विद्यार्थी रास्त मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले असतांना सरकार त्यांच्या धैर्याला भ्याडपणाने आणि अन्याय्य वर्तन करून प्रतिसाद देत आहे, असा आरोप काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

एका इंग्रजी वर्तमानपत्रात ‘शिक्षण व्यवस्थेचा र्हास, तरुण भारताचा आघात’ हा लेख लिहून त्यांनी हे आरोप केले.
"स्टूडेंट्स का आंदोलन नरेंद्र मोदी सरकार की विफल नीतियों का परिणाम है."
– 'द हिंदू' अखबार में प्रकाशित CPP चेयरपर्सन श्रीमती सोनिया गांधी जी के लेख का हिंदी अनुवाद: pic.twitter.com/8euOIko578
— Congress (@INCIndia) July 24, 2026
गांधी यांनी पुढे लिहिले की,
१. देशभरातील विद्यार्थी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटणे आणि ढासळत्या शिक्षणव्यवस्थेच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलने करत आहेत. त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत – सरकारने उत्तरदायित्व सुनिश्चित करावे आणि शिक्षणात सुधारणा घडवून आणाव्यात.
| सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला लेख – |
२. मोदी सरकारने एकूण अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाचा वाटा ५० टक्क्यांनी आणि उच्चशिक्षणाचा वाटा ३३ टक्क्यांनी अल्प केला. गेल्या १२ वर्षांत सरकारने अनुमाने १ लाख सरकारी शाळा बंद केल्या, तर ४३ सहस्र खासगी शाळा उघडल्या. यांपैकी मोठा भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संलग्न संघटनांद्वारे चालवला जातो. (राष्ट्रप्रेमी संघाच्या शाळा चालू होणे, याचा गांधी यांना पोटशूळ आहे. – संपादक)
३. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना चांगल्या नोकर्यांच्या संधी मिळत नाही. असे असूनही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदीय समितीच्या शिफारसी फेटाळून लावल्या आणि अशा मोठ्या घटनांनंतरही त्यागपत्र देण्यास नकार दिला. (काँग्रेस ६ दशके सत्तेवर होती. त्या वेळी तिने काय केले, हे गांधी का सांगत नाहीत ? – संपादक)
४. देहली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांनी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांना दडपण्यासाठी लाठीमार, अश्रुधूर अन् पेलेट गन यांसारख्या हिंसेचा वापर केला. या हिंसाचारात अनेक निरपराध विद्यार्थी घायाळ झाले.

आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’