गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांच्‍या आश्रमात ‘ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ’ पार पडला !

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी आश्रमात ऋग्‍वेद संहिता स्‍वाहाकार महायज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. सातारा येथील वेदशास्‍त्रसंपन्‍न श्री. गोविंदशास्‍त्री जोशी यांच्‍या अधिपत्‍याखाली हा सोहळा पार पडला. 

सज्जन पालक आणि दुर्जन संहारक राजा असला की, विश्वात सगळे स्थिर होईल !

इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.

धूर्त युरोपियनांनी हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिणे !

धूर्त युरोपियनांनी लिहिलेला इतिहास सत्य गृहित धरून आमच्या धर्मवाङ्मय आणि परंपर यांचा अभ्यास आम्ही चालू केला. त्याला चिकित्सक (critical) अभ्यास असे गोंडस नाव दिले आणि हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची केला.

राष्ट्र आणि विश्व यांच्या उत्कर्षाकरता समर्पित व्हा !

‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे.

कितीही ‘सेक्‍युलरीशाह्या’ (निधर्मीवाद्यांची सत्ता) आल्‍या, तरी त्‍या श्रुति-स्‍मृति पुराणोक्‍ताच्‍या आसपासही फटकू न शकणे !

संस्‍कृतीद्वेष्‍ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्‍थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्‍हा हिंदूजनांच्‍या स्‍वाभाविक अभिरूचीवर त्‍याचा काहीही परिणाम झाला नाही.

धर्माचरण अतीशीघ्र करण्‍याची आवश्‍यकता !

धर्माचरणाची संधी आली की, आम्‍ही ती पुढे ढकलतो. ‘अन्‍य सगळ्‍या कामांना, फडतूस कर्मांनाही अग्रहक्‍क आणि धर्म अखेरचे काम’, असे करतो. वय निघून जाते. ‘म्‍हातारपणी धर्म करू’, असे म्‍हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्‍हातारपणी पालटता कसे येईल ?’

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !

असंख्‍य विचारवंत अन् शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्‍कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्‍हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धाच मोडण्‍यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्‍यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’

भारत दुबळा आणि भेकड झाला आहे

‘आज भारतातला विशिष्‍टवर्ग स्‍वधर्माचा त्‍याग करण्‍यात भूषण मानतो . . . फास्‍टफूड यांचा धुमाकूळ इथे चालू आहे. हा भारत दुबळा आणि भेकड झाला आहे. ठार बुडाला आहे.’

वैदिक संस्‍कृतीचा द्वेष आणि तिला नामशेष करण्‍याचे षड्‍यंत्र !

वैदिक संस्‍कृतीची स्‍मृती होईल, अशा वस्‍तू आमच्‍याच राष्‍ट्रातून नामशेष झालेल्‍या दिसत आहेत. आम्‍ही वैदिक संस्‍कृतीच्‍या हवेत श्‍वास घ्‍यावा, ही उत्‍कटता असतांना कडव्‍या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्‍य झाले आहे.

मंदिरांच्‍या मर्यादेचे रक्षण करणारा देव !

देवदर्शनाकरता व्‍याकुळलेल्‍या चोखोबा भक्‍ताच्‍या भेटीला पांडुरंगच स्‍वतः मंदिराबाहेर येतात. शास्‍त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्‍वतःच रक्षण करतात.