हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !

‘आर्यांचे आक्रमण किंवा ‘आर्य-अनार्य’ असे फालतू सिद्धांत आम्‍हा हिंदूंच्‍या डोक्‍यात कोंबणे, शाळांतून शिकवणे म्‍हणजे सनातन हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांवरील श्रद्धेचा चुराडा उडवणे आहे. आज सर्व बाजूंनी, सर्व क्षेत्रांतून सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धा ढासळून टाकण्‍याचा आटोकाट प्रयत्न होतो आहे. स्‍वतः विचारवंत म्‍हणवणारे राजा राममोहन रॉय, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, महाराष्‍ट्राचे लोकहितवादी फुले, आगरकर, भांडारकर, तेलंग, आर्य आक्रमणाचा सिद्धांत प्रस्‍थापित करून colonial missionary model (वसाहतवादी धर्मप्रचारकाची प्रतिकृती) करू पहाणारे मेकॉले, मॅक्‍समुल्लर, मोहोंजोदारोवरचा वर्ष १९३० मध्‍ये बॅनर्जीचा अहवाल दडवून टाकणारा सर जॉन मार्शल, असे असंख्‍य शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्‍कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्‍हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धाच मोडण्‍यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्‍यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’

– गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी

(साभार : मासिक, ‘घनगर्जित’, मे २०२२)