परम श्रेष्ठ परमात्म्यासाठी वेळ दिल्यास परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होणे
‘आपला वेळ हलक्या कामात लावल्याने हलके फळ मिळते, मध्यम कामात वेळ लावल्याने मध्यम फळ मिळते आणि उत्तम कामात लावल्याने उत्तम फळ मिळते.
‘आपला वेळ हलक्या कामात लावल्याने हलके फळ मिळते, मध्यम कामात वेळ लावल्याने मध्यम फळ मिळते आणि उत्तम कामात लावल्याने उत्तम फळ मिळते.
शेतात बी पेरण्यासाठी ज्याप्रमाणे भूमीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे…
सध्या सर्वत्रची स्थिती चिंताजनक आहे. कुणालाही धर्मशिक्षण नाही. धर्माविषयी सर्वच अज्ञानी आहेत. त्यासाठी ‘समाजामध्ये अध्यात्मप्रसार करून धर्म आणि राष्ट्र यांच्या उत्थापनार्थ करावयाची सेवा’ या संदर्भात जागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे.
सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे, हा खरा सत्समागम आहे. देहाचे भोग येतील-जातील; पण तुम्ही सदा आनंदात रहा. तुम्हाला आता काही करण्याचे उरले आहे, असे मानू नका.
प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले, तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे, हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.
भगवंताचे स्मरण हे कसे आहे ? बाकी सगळ्या गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली, तर ‘भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ आहे.’..
मध गोळा करणे, ही जशी मधमाशांची सहज प्रवृत्ती असते, तशी भक्तांमध्ये नामस्मरण, भगवत् चिंतन ही सहज प्रवृत्ती झाली पाहिजे.
सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे बाळासाहेब विभूते यांच्या शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत, निधनाच्या वेळी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘पहाणे, ऐकणे, सुवास घेणे, चव घेणे, स्पर्श करणे, शारीरिक आराम, यश आणि मान या ८ प्रकारच्या सुखांपेक्षाही परमात्म-सुख विशेष आहे. या ८ सुखांमध्ये न गुरफटता परमात्म-सुखात निमग्न होणाराच धन्य होय.’
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला