भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ असल्याने ते सतत घेणे महत्त्वाचे !

गोंदवलेकर महाराज

‘भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे’, ही अगदी खूणगाठ बांधून ठेवा. भगवंताचे स्मरण हे कसे आहे ? बाकी सगळ्या गोष्टी, सगळी सत्कर्मे, दानधर्म म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांसारख्या आहेत. ही सगळी इंद्रिये मानली, तर ‘भगवंताचे स्मरण हा ‘प्राण’ आहे.’ बाकीची सर्व इंद्रिये जरी असली आणि प्राण नसेल, तर इंद्रियांचा काही उपयोग नाही. तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी रहा. कर्तव्याला चुकू नका, कर्तव्य करत असतांना परमात्म्याचे स्मरण राखा, मुखामध्ये राम असू द्या.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)