‘नामस्मरण’ ही भक्ताची सहज प्रवृत्ती व्हायला हवी !

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

मध गोळा करणे, ही जशी मधमाशांची सहज प्रवृत्ती असते, तशी भक्तांमध्ये नामस्मरण, भगवत् चिंतन ही सहज प्रवृत्ती झाली पाहिजे. वेळ मिळाला की, त्यात तो रमला पाहिजे. नव्हे, त्याखेरीज त्याला त्याचे जीवन शुष्क आणि निरर्थक वाटले पाहिजे. शरणागतीनेच हे साधेल.

– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

(साभार : ‘अध्यात्म संवाद (भाग-४)’ या ग्रंथातून, संकलक : श्री. श्रीप्रसाद वामन महाजन)