स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला, तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत, तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण. शेतात बी पेरण्यासाठी ज्याप्रमाणे भूमीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले, म्हणजे भगवंतापासून दुसरा कुणी नाही, ही भावना टिकवणे, म्हणजेच अनुसंधान ठेवणे फारसे जड जात नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्यात. त्याकरता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे आणि आनंदात रहावे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. प्रा. के.व्ही. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)