हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सनातन संस्थेचे मोठे योगदान असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी सनातन संस्थेचे साधक कार्यरत असतात.

‘हैद्राबाद बुक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे एका ‘यु ट्यूब’ वाहिनीच्या प्रतिनिधीने चित्रीकरण करून त्याचे प्रसारण केले. त्यात अधिकाधिक लोकांनी संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देण्याविषयी आवाहन करण्यात आले.

नवी मुंबई येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

मेक्सिको येथील ‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये सनातनचे ग्रंथ प्रदर्शित !

भारत शासनाच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने सनातनचे ग्रंथ या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यासाठी पाठवण्यात आले होते.

फरीदाबाद (हरियाणा) येथील गीता महोत्सवामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

फरीदाबाद येथे जिल्हास्तरीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.

मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

वर्ष २०२१ च्या दत्तजयंती निमित्त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती देत आहोत.

घाटकोपर ‘प्रेसिडेन्शियल टॉवर’ येथे ७ डिसेंबर या दिवशी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन

या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात येणार आहे. या ठिकाणी  साधना, अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील महत्त्वाचे ग्रंथ उपलब्ध असणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.