ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !

सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाला विविध मान्यवरांची भेट !

ठाणे येथील ग्रंथप्रदर्शन आणि उत्पादनवितरण केंद्राला भेट देतांना भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. संजय वाघुले

ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती. त्या वेळी विविध मान्यवरांनी या वितरणकेंद्रांना भेटी दिल्या. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला.

खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ भेट देतांना श्री. संदीप अग्निहोत्री

डोंबिवली येथील गोग्रासवाडी येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे उभारण्यात आलेल्या वितरण केंद्राला शिवसेनेचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. त्या वेळी डोंबिवली येथील शिवसेनेचे नेते श्री. राजेश मोरे यांनी श्री. शिंदे यांना सनातन संस्थेचे डोंबिवली येथे चालू असलेल्या कार्याविषयी माहिती सांगून कार्याचे कौतुक केले. सनातन संस्थेचे साधक श्री. संदीप अग्निहोत्री यांनी श्री. शिंदे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव विशेषांक भेट दिला, तर ठाणे येथील उमा निलकंठ व्यायामशाळेजवळ उभारण्यात आलेल्या ग्रंथ आणि उत्पादन वितरण केंद्राला भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक संजय वाघुले यांनी भेट दिली. तसेच प्रसिद्ध प्रवचनकार सौ. धनश्री लेले यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.