श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

१७.४.२०२४ या दिवशी श्रीरामनवमी आणि २३.४.२०२४ या दिवशी हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

श्रीराम

१. ‘श्रीराम (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)’ आणि ‘मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)’ या दोन्ही लघुग्रंथांविषयी

बहुतेकांना देवाविषयी जे थोडेफार ज्ञान असते, ते बहुधा त्यांनी लहानपणी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींमुळे असते. अशा अल्प ज्ञानामुळे त्यांचा देवावरचा विश्वासही अल्पच असतो. देवतांविषयी अधिक ज्ञान मिळाल्यास अधिक विश्वास निर्माण होण्यास साहाय्य होते. विश्वासाचे रूपांतर पुढे श्रद्धेत झाल्यामुळे देवतेची उपासना अन् साधनाही चांगल्या प्रकारे होते. तसे व्हावे; म्हणून या लघुग्रंथात श्रीराम आणि मारुति यांच्याविषयी इतरत्र बहुधा न दिलेले; पण उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय  ज्ञान देण्यावर विशेष भर दिला आहे.

२. ‘श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र’ अन् ‘हनुमानचालिसा’ (हिंदीत) हेही लघुग्रंथ उपलब्ध आहेत.

३. ‘देवता, अध्यात्मशास्त्र, साधना, धार्मिक कृती, आचारधर्म’ इत्यादींविषयीचे बहुमोल ज्ञान असलेले ग्रंथ उपलब्ध आहेत.

४. देवतांच्या नामपट्ट्या

विविध देवतांच्या नामपट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत.

५. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदके

शिव, दत्त, गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, मारुति, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मी, अष्टदेवता यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहित), तसेच शिव-दुर्गा, दत्त-गणपति, कृष्ण-लक्ष्मी, राम-मारुति, यांची चित्रे असलेली पदके (लॉकेट्स) धाग्यासहित. ग्रंथ, उत्पादने इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी वरील प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी उपरोल्लेखित ग्रंथ अन् अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर अथवा http://sanatanshop.com या संकेतस्थळावर करावी.


 सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यात, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील’, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो.