कर्णावती (गुजरात) – येथे ‘नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचा कक्ष लावण्यात आला. या कक्षामध्ये धर्म, अध्यात्म, धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्माचरण, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, बालसंस्कार, आयुर्वेद, तसेच राष्ट्ररक्षण अशी सनातननिर्मित विविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रदर्शित करण्यात आली. सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या कक्षाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे ‘बुक फेस्टिव्हल’ ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत पार पडले.