गोवा : विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची बाल हक्क आयोगाची मागणी

डिचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयात ‘पेपर स्प्रे’चा वापर केल्याचे प्रकरण

पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – डिचोली येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग चालू असतांना ‘पेपर स्प्रे’चा  (श्वसनाचा त्रास होणार्‍या रसायनाच्या फवार्‍याचा) वापर केल्याने विद्यालयाच्या व्यवस्थापनाने ५ विद्यार्थ्यांना एका मासासाठी विद्यालयातून निलंबित केले आहे. या शिक्षेमुळे संबंधित विद्यार्थ्यांची गळचेपी होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार असल्याचा दावा करून बाल हक्क आयोगाने हे निलंबन त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी या आशयाचे पत्र शिक्षण खात्याला पाठवले आहे.

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस

आयोगाच्या मते विद्यार्थ्यांना शाळेत राहून त्यांची वागणूक सुधारण्यासाठी आवश्यक सेवा पुरवावी. (बाल हक्क आयोग किंवा मानवाधिकार आयोग यांना गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांचा कळवळा न येता गुन्हे करणार्‍यांचा कळवळा कसा काय येतो ? – संपादक)

Corporal Punishment_ Violation of Child Rights in Schools


सविस्तर वृत्त वाचा –

गोवा : ‘पेपर स्प्रे’चा वापर करणारे ५ विद्यार्थी विद्यालयातून एक मासासाठी निलंबित
https://sanatanprabhat.org/marathi/712351.html

भर वर्गात विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास : डिचोली (गोवा) येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील घटना
https://sanatanprabhat.org/marathi/712002.html