तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या मतांची संख्या घटेल ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगो

काँग्रेस आणि भाजप यांनी सत्तेच्या लोभापोटी गोव्यात फूट पाडण्याचे राजकारण चालू केले होते अन् आता भाजप आणि काँग्रेस यांचेच अनुकरण तृणमूल काँग्रेस करत आहे.

शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार, इतरांशी युती करणार नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

बंगालची तृणमूल काँग्रेस गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर महाराष्ट्रातील शिवसेनाही गोव्यात निवडणूक लढवू शकते. शिवसेना गोव्यात विधानसभेच्या २२ जागा लढवणार…..

थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांचा विसर पडणे, राज्यकर्त्यांना लज्जास्पद ! – नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय’ संघटना

गोवा मुक्तीलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांच्या स्मृतीदिनाचा वास्को येथील राजकारण्यांना विसर पडल्याविषयी आश्चर्य वाटते. राजकारण्यांसाठी ही गोष्ट लज्जास्पद आहे.

दिवसा पथदीप (स्ट्रीट लाईट) चालू राहिल्याने होणारा विजेचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना काढा !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोव्याचे ऊर्जामंत्री, दक्षिण गोव्यातील विद्युत् विभागाचे अधीक्षक अभियंता आणि फोंडा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्रशासन इच्छुक ! – शोभा करंदलाजे, केंद्रीय कृषी राज्यमंत्री

‘‘गोव्याला कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालयाची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र गोवा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’’

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना १ वर्षाची मुदतवाढ

शासनाने कॅसिनोंना सातत्याने मुदतवाढ देणे नव्हे, तर ते कायमचे बंद करणे अपेक्षित आहे !

फोंडा तालुक्यातील महत्त्वाची मंदिरे भाविकांसाठी खुली

मंदिरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले

‘आयुष आपके द्वार’ मोहिमेअंतर्गत उगवे, पेडणे येथे औषधी वनस्पतींचे वाटप आणि लागवडीविषयी मार्गदर्शन

आयुष मंत्रालयाच्या ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र पश्चिम विभागा’च्या वतीने उगवे, पेडणे येथे औषधी वनस्पतींचे वाटप आणि लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आजूबाजूच्या गावातील सुमारे २५ शेतकरी उपस्थित होते.

गोव्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत चालू करण्याची वैद्यकीय तज्ञ समितीची शिफारस

कोरोना महामारीच्या अनुषंगाने शासनाने नेमलेल्या तज्ञ वैद्यकीय समितीने राज्यात शाळा प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ अशा दोन्ही स्वरूपांत (हायब्रीड मोड) चालू करण्याची शिफारस राज्यशासनाला केली आहे.