वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोव्यातील राजकीय घडामोडी !

निवडणूक जवळ आल्यावर पक्षांतर करणारे स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ होते का ?

किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत गोव्यात ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना !

७७ संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्‍या १५० प्रतिनिधींच्या बैठकीत ‘हिंदु महाआघाडी’ची स्थापना करण्याचा ठराव संमत

‘वॉर्ड बॉय’कडून रुग्णालयाच्या ‘लिफ्ट’मध्ये २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग !

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील ‘वॉर्ड बॉय’ गोविंद (वय ४७ वर्षे) याने रुग्णालयाच्या ‘लिफ्ट’मध्ये २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी ‘वॉर्ड बॉय’ गोविंद याला कह्यात घेतले.

‘बॉलीवूड’शी संबंध असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अमली पदार्थ व्यावसायिकाला गोव्यात अटक

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एन्.सी.बी.) ‘बॉलीवूड’चे (हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हणतात.) अर्जुन रामपाल यांची दक्षिण आफ्रिका येथील प्रेयसी गाब्रियाला डिमीट्रायडेस हिचा भाऊ ॲजिसिलाओस डिमीट्रायडेस याला अमली पदार्थ प्रकरणात कह्यात घेतले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याची राहुल गांधी यांची सूचना ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेसचे गोवा प्रभारी

ते पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी देहली येथे एक बैठक घेतली आणि या बैठकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला.

२७ सप्टेंबरपासून गोव्यात मुसळधार पाऊस पडणार !  – हवामान विभाग

बंगाल खाडीवर २४ सप्टेंबरपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि ही स्थिती आता आणखी खालावली आहे. त्यामुळे गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

गोव्यातील कलम १४४ मागे घेतले असून कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात लागू झालेले कलम १४४ (जमावबंदी आदेश) २० सप्टेंबरपासून मागे घेण्यात आला आहे, तर कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

गोव्यात संचारबंदीच्या संदर्भातील चित्र अस्पष्ट : धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन संभ्रमात !

गोव्याच्या जिल्हा प्रशासनाचा कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांविषयीचा आदेश २० सप्टेंबर २०२१ या दिवशी संपुष्टात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या आदेशाचे नूतनीकरण न केल्याने भारतीय दंड संहितेचे १४४ कलम गैरलागू ठरले आहे.

अमिताभ बच्चन यांनी पानमसाल्याच्या विज्ञापनातून त्यांचा सहभाग काढून घ्यावा ! – ‘राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थे’चे बच्चन यांना आवाहन

एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीला कोणत्या उत्पादनाच्या विज्ञापनात सहभाग घ्यायचा, हे कळत नसणे दुर्दैवी !

वास्को पोलिसांकडून आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचा सट्टाबाजार उघडकीस : ६ जणांना अटक

सट्टाबाजारासाठी वापरण्यास येत असलेले २ लॅपटॉप, अनेक भ्रमणभाष संच, काही कागदपत्रे आदी साहित्य कह्यात घेण्यात आले.