शिवसेना गोवा विधानसभेच्या २२ जागा लढवणार, इतरांशी युती करणार नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

श्री. संजय राऊत

पणजी, ३० सप्टेंबर (वार्ता.) – बंगालची तृणमूल काँग्रेस गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर महाराष्ट्रातील शिवसेनाही गोव्यात निवडणूक लढवू शकते. शिवसेना गोव्यात विधानसभेच्या २२ जागा लढवणार आणि आम्ही निवडणुकीत इतरांशी युती करणार नाही, अशी माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.