अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अनधिकृत मशिदीचा विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली.
आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरामध्ये अनधिकृत मशिदीचा विरोध केल्याने धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली.
बांगलादेशात धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. धर्मांधानी हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या वर्ष २०२० च्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे.
ओडिशामधील बिजू जनता दल सरकारच्या मंत्रीमंडळाने पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी सरकारी अधिकार्यांना अधिकार दिला आहे.
भाजपचा पराभव झाला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे. काँग्रेस आघाडीचा मुख्य उद्देश सनातन धर्म नष्ट करणे हा आहे. त्यासाठी काँग्रेसने टिकून राहिले पाहिजे, असे विधान तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांनी केले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संचालित १३ संस्थांना मुख्यमंत्री साहाय्य कोषातून ७८ लाख ७६ सहस्र रुपये दिले आहेत.
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे.
गया (बिहार) नगरपालिकेकडून शहरात पिंडदान केल्या जाणार्या ५० ‘पिंड वेदी’ येथे पिंडदान करणार्याकडून ५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. या परिसराची स्वच्छता आणि देखभाल यांसाठी हे शुल्क वसूल केले जाणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे अहसान (वय २२ वर्षे) यांच्यावर मुसलमानांनी सामाजिक बहिष्कार घातला आहे. अहसान यांना धमकीचे दूरभाष येत आहेत.
कर्नाटकातील बोम्मेनहळ्ळी पाळ्य या मुसलमानबहुल गावातील अंगणवाडी केंद्रात मुसलमान कार्यकर्त्याची नेमणूक न केल्याने गेल्या २२ दिवसांपासून धर्मांध गावकर्यांनी केंद्राला टाळे लावले आहे.
कर्नाटकच्या भाजप सरकारने राज्यातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी, ‘सरकार एक ऐतिहासिक चूक करत आहे. मंदिरे सरकारची संपत्ती आहे’, असे म्हटले.