डुकराचा अंश असलेल्या कोरोना लसीला ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’ची मान्यता

कोरोनाच्या विषयात ‘पोर्क जिलेटीन’कडे अन्न म्हणून नव्हे, तर औषध म्हणून पाहिले जात आहे – ‘संयुक्त अरब अमिरात फतवा परिषदे’चे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन

डुकराची चरबी असल्याच्या शक्यतेवरून चीनकडून सिद्ध करण्यात येणारी कोरोनावरील लस न वापरण्याचा मुसलमान संघटनांचा निर्णय

धर्माच्या आधारे कोरोना लसीला इस्लामी राष्ट्र मान्यता देते; पण भारतातील मुसलमान विरोध करतात ! ही त्यांची धर्मांधातच नव्हे का ?

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा विचार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा शासनाचा विचार नाही, तसेच या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही काही विशेष सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात नवीन ९० कोरोनाबाधित

गोव्यात २४ डिसेंबरला ९० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे दिवसभरात १ मृत्यू झाला आहे, तर ८८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतचे एकूण मृत्यू ७२८ झाले आहेत.

ब्रिटनहून आलेले ५ कोरोनाबाधित प्रवासी विमानतळावरून पसार

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसमवेतची विमान वाहतूक स्थगित केली आहे. त्यापूर्वी ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्णांनी देहली विमानतळावरूनच पलायन केल्याची घटना घडली.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता संसर्ग

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिथे दळणवळण बंदी अधिक कडक करण्यात आली आहे. हा ‘स्ट्रेन’ (विषाणू) नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे युरोपीय देश सतर्क झाले आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन ‘स्ट्रेन’च्या संक्रमणाविषयी ही सूत्रे लक्षात घ्या !

१. ब्रिटन हा आयुर्वेदानुसार ‘आनूप देश’ आहे. अशा ठिकाणी कफाचा प्रभाव आधिक्याने दिसतो. स्वाभाविकपणे कफाशी संबंधित विकार प्रबळ होतात. (आपल्याकडे गोवा, केरळ, बंगाल ही आनूप देशाची काही प्रमुख उदाहरणे)…

नागरिकांना संकटाची जाणीव करून देणे आवश्यक असल्यामुळे रात्रीची संचारबंदी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे काही जणांकडून टीका केली जात आहे; मात्र जनतेला बंधन आणि संकट यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती

भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, त्यांचा वाहनचालक आणि अन्य एक अशा तिघांचा कोरोनाविषयीचा अहवाल सकारात्मक आला आहे. जठार हे त्यांच्या कासार्डे येथील घरी गृहअलगीकरणात आहेत.

गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा १ सहस्र

गोव्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण १ सहस्रहून अल्प झाले होते. ही संख्या २३ डिसेंबरला १२५ नवीन कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा १ सहस्र झाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात २ मृत्यू झाले आहेत, तर ७० रुग्ण बरे झाले आहेत.