श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

जेव्हा मी कुंकू लावते, तेव्हा माझा ‘श्रीसत्शक्तिदेव्यै नमः । ’, श्रीचित्‌शक्तिदेव्यै नमः ।’, असा नामजप आपोआप होऊ लागतो. त्यातून मला पुष्कळ आनंद अनुभवता येतो.

तीन गुरूंच्या (टीप) छायाचित्रासमोर आत्मनिवेदन केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पाठवलेला गजरा एका साधिकेने आणून देणे आणि ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे !’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पत्र अर्धे लिहून झाले, तेवढ्यात एक साधिका माझ्या खोलीत आली. ती मला म्हणाली, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुला गजरा दिला आहे.’’स्थुलातून त्यांनी मला आध्यात्मिक लाभासाठी गजरा पाठवला होता.

SANATAN SANSTHA In ABU DHABI : अबू धाबी येथील ‘हार्मनी’ कार्यक्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

१५ फेब्रुवारी या दिवशी ‘हार्मनी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिर सर्वांना दर्शनासाठी १ मार्च २०२४ पासून उघडण्यात येणार आहे.

श्री. वाल्मिक भुकन

मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवतात, तसे साधकाला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन छायाचित्रे काढण्यास घडवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला सेवेकडे आध्यात्मिकदृष्टीने पहायला शिकवले. त्यामुळे सेवा करतांना आत्मविश्वास वाढून मनातील भीती नाहीशी झाली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सौ. नंदिनी साळोखे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ चालत असतांना त्यांच्या चरणांकडे पाहिले, तर ‘ते साक्षात् देवीचेच कोमल चरण आहेत’, असे मला वाटले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या धर्मध्वजपूजनाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

फुलांना भगवंताचा स्पर्श झाला की, त्यांना चैतन्य प्राप्त होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हातात पुरोहितांनी फुले दिल्यावर मला तसेच जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका कार्यशाळेच्या वेळी कु. भारती माळीपाटील यांना आलेल्या अनुभूती

जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या, तेव्हा त्यांना पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. डोळे उघडल्यावर त्या मला मुकुटधारी देवीसारख्या दिसल्या.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार भाव ठेवल्यावर माझ्या मनाची प्रक्रिया होऊन मन शुद्ध होत गेले आणि ‘मला स्वतःमध्ये पालट करायचे आहेत’, असे वाटू लागले.

साधिका लसूण सोलण्याची सेवा करत असतांना भावजागृतीचा प्रयत्न करतांना तिला आलेली अनुभूती

मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी ‘ॐ’ म्हटले की, ‘माझ्या हातात ‘ॐ’ दिसत आहे. नंतर त्या ठिकाणी पिवळ्या गुलाबाचे फूल दिसत आहे. ते फूल मी गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत आहे.’ हे दृश्य मला ५ मिनिटे दिसत होते…….

मनमोकळेपणा, तत्त्वनिष्ठता आणि अध्यात्माची आवड असणारे सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील (कै.) मोहन पेंढारकर (वय ७८ वर्षे) !

(कै.) मोहन पेंढारकर यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे दिली आहेत.