१. शिकायला मिळालेली सूत्र
‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) परिपूर्ण आहेत. त्यांच्या चरणी लीन व्हायचे, तर ‘मला प्रत्येक कृती परिपूर्ण करायची आहे’, हे शिकायला मिळाले.
२. बालसाधक बोलत असतांना मनात नकारात्मक विचार येणे
बालसाधक बोलत असतांना मला काहीच ऐकू येत नव्हते; मात्र माझ्या मनात ‘या बालसाधकांच्या घरी त्यांचे आई -वडील साधक असल्याने त्यांना साधना करणे शक्य झाले. मला मात्र हे शक्य होणार नाही’, असा नकारात्मक विचार येत होता.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मुकुटधारी देवीसारख्या दिसणे
जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या, तेव्हा त्यांना पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. डोळे उघडल्यावर त्या मला मुकुटधारी देवीसारख्या दिसल्या. त्यांनी भांगात, नाकात धारण केलेल्या आभूषणांमधून सोनेरी प्रकाश प्रक्षेपित होत होता.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती
४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मुख गुलाबी दिसणे : ‘गुरुदेवांच्या सत्संगाच्या वेळी मला त्यांचे मुख गुलाबी रंगाचे दिसत होते आणि गुरुदेवांचे चैतन्य मोठ्या प्रमाणात गोलाकारात दिसत होते.
४ आ. गुरुदेवांच्या चरणांच्या खाली आदिशेषाच्या अंगावरील चर्मासारखे दृश्य दिसले.
५. कृतज्ञता
‘माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझे मनोबल पुष्कळ न्यून झाले होते. माझ्या मनात निराशेचे विचार येत होते. घरी मी एकटीच असतांना माझ्या मनात ‘गुरुदेव माझ्यासह आहेत आणि प्रत्येक त्रासातून बाहेर पडण्यासाठी ते मला साहाय्य करत आहेत’, अशी श्रद्धा निर्माण झाली. त्यांच्या कृपेने दुःख दूर होऊन मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांनी साधनेत ठेवले, त्यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’
– कु. भारती माळीपाटील (वय २० वर्षे), हनुमाननगर, बेंगळुरू, कर्नाटक.
|