१. ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील फलकावर ‘श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आगमन झाले आहे’, असे लिहिलेले वाचून ‘परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले आहेत’, या भावाने माझे मन भरून आले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आश्रमात आल्या असतांना पितृपक्ष चालू होता, तरीही आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाले होते. मला वातावरणात आनंदाच्या लहरी जाणवत होत्या.
३. ‘साक्षात् महालक्ष्मीच त्यांच्या माध्यमातून सर्व साधकांचे त्रास दूर करण्यासाठी आली आहे’, असे मला जाणवले.
४. त्यांचे आश्रमात वास्तव्य असतांना मला आध्यात्मिक त्रास जाणवला नाही. मला पुष्कळ आनंद होत होता.
५. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे चालणे, वागणे आणि बोलणे सर्वकाही परात्पर गुरुदेवांसारखेच आहे’, असे मला जाणवत होते.
६. श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ चालत असतांना त्यांच्या चरणांकडे पाहिले, तर ‘ते साक्षात् देवीचेच कोमल चरण आहेत’, असे मला वाटले आणि माझी पुष्कळ भावजागृती झाली.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्यावर ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटायचे. मला त्यांचे रूप अधिकाधिक हृदयात साठवायचे होते.
‘परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पहाण्याची आणि अनुभवायची संधी मिळाली’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नंदिनी साळोखे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४२ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|