श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात ‘मनमोकळेपणाचा संवाद’ या सत्रात साधकांना त्यांची ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ यांत होत असलेल्या मनाच्या अयोग्य प्रक्रियेविषयी सांगायचे होते. मलाही त्याविषयी सांगायचे होते.

श्री. श्रीकांत बोराटे

त्या वेळी माझ्या मनात ‘मी पुढे जाऊन बोललो, तर सहसाधक माझे कौतुक करतील’, असा विचार येत होता. मी ३ – ४ वेळा उभा राहिल्यावर त्याच वेळी अन्य साधक बोलण्यासाठी पुढे जात असल्याने मला बोलायची संधी मिळाली नाही. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘एखादा साधक बोलत असतांना अन्य साधकांनी स्वतःच्या मनाचीही शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवायला हवा.’’

मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार भाव ठेवल्यावर माझ्या मनाची प्रक्रिया होऊन मन शुद्ध होत गेले आणि ‘मला स्वतःमध्ये पालट करायचे आहेत’, असे वाटू लागले.

मी सूक्ष्मातून गुरुदेवांना विचारले, ‘माझी अशी मनाची प्रक्रिया कशी झाली ?’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांच्या संकल्पानेच ही प्रक्रिया झाली.’

– श्री. श्रीकांत बोराटे, पुणे (२१.८.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक