कृतज्ञता

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २००

वैद्य मेघराज पराडकर

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचे २०० भाग आज पूर्ण होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांच्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.

खरेतर आयुर्वेद हे भारतीय वैद्यकशास्त्र दैनंदिन जीवनात आचरण्यास अत्यंत सोपे आणि सुलभ आहे. प्रत्येकानेच आयुर्वेदात दिलेल्या सोप्या सोप्या नियमांचे पालन केल्यास देश निरोगी होईल, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आरोग्यसुविधांसाठीचा खर्चही न्यून करणे शक्य होईल. यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून आयुर्वेदाचे नियम शिकवणे आवश्यक आहे. भावी हिंदु राष्ट्रात ‘आयुर्वेद ’ हीच मुख्य उपचारपद्धत असेल. तसे होण्यासाठी प्रत्येकाला आयुर्वेद समजणे महत्त्वाचे आहे.

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेद्वारे सामान्य जनतेलाही सहजपणे समजेल, अशा भाषेतून आयुर्वेद सांगितला जात आहे. ‘ही सेवा माझ्याकडून अशीच अखंड चालू राहू दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan