निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०३
बिस्किटे, शेव, चिवडा, चिप्स, फरसाण यांसारखे विकतचे तेलकट पदार्थ कधीतरी गंमत किंवा पालट म्हणून खाण्यास आडकाठी नसते; परंतु असे पदार्थ नियमितपणे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. हे पदार्थ बनवण्यासाठी पामतेलासारख्या निकृष्ट तेलाचा वापर केला जातो. यांतून शरिराला काहीच पोषणमूल्य प्राप्त होत नाही. असे पदार्थ नियमित खाण्याने भूक मंदावणे, केस गळणे, केस पांढरे होणे, बद्धकोष्ठता, वात वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. या पदार्थांऐवजी मूग, कणिक, रवा, मेथी इत्यादींचे लाडू, शेंगदाणा चिक्की, तिळगूळ यांसारखे पौष्टिक पदार्थ खावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |