दात शिवशिवण्‍यावर घरगुती उपचार

‘थंड किंवा गोड खाल्‍ल्‍यावर दात शिवशिवण्‍याचा त्रास वारंवार होत असेल, तर प्रतिदिन सकाळी चहाचा चमचाभर तिळाचे तेल तोंडात धरावे आणि साधारण ५ ते १० मिनिटांनी थुंकून टाकावे. याने दात शिवशिवणे न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते.’

ताप आलेल्‍या रुग्‍णाला जेवणाचा आग्रह करू नये !

‘खाल्ले नाही, तर शक्‍ती मिळणार नाही’, असा सर्वसाधारण समज असतो; परंतु ‘प्रत्‍येकाच्‍या शरिरात अन्‍नाचा राखीव साठा असल्‍याने १ – २ दिवस काही न खाता उपवास केल्‍यास काही अपाय होत नाही’, हे लक्षात घ्‍यावे आणि तापाच्‍या रुग्‍णाला जेवणाचा आग्रह करणे टाळावे.’

तापातून लवकर बरे होण्‍यासाठी हे करावे !

ताप असतांना आपोआप उलटी झाल्‍यास लगेच उलटी थांबवण्‍याचे औषध घेऊ नये. तापामध्‍ये आपणहून एखाददुसरी उलटी झाल्‍यास ताप लवकर बरा होतो. (स्‍वतः मुद्दामहून उलटी करणे टाळावे.)’

बुरशीजन्‍य त्‍वचाविकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी कपडे नीट वाळवूनच वापरावेत

‘पावसाळ्‍यात वातावरणामध्‍ये आर्द्रता अधिक असल्‍याने बुरशीजन्‍य त्‍वचाविकार (फंगल इन्‍फेक्‍शन) होण्‍याची शक्‍यता वाढते. या विकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी ओलसर कपडे वापरणे टाळावे.’

आयुर्वेदानुसार ‘संतुलित आहारा’ची संकल्‍पना !

‘संतुलित आहार’ हा शब्‍द ऐकताच प्रथिने, पिष्‍टमय पदार्थ, असे शब्‍द आपल्‍या डोळ्‍यांसमोर येतात; परंतु आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने आपल्‍या आहारामध्‍ये ६ चवीचे (षड् रस) पदार्थ असतील, तर तो संतुलित आहार समजला जातो.

नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण सनातन ब्राह्मी चूर्ण

‘सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करून ३० मिनिटांनी १ चमचा सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण १ कप दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्यावे. नंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. हा उपचार १ ते ३ मास करावा.

पावसाळ्‍यामध्‍ये पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळावे !

पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीही (पचनशक्‍तीही) वरील उदाहरणातील निखार्‍यांप्रमाणे मंद असतो. अशा वेळी इडली, पावभाजी, वडापाव, साबुदाण्‍याची खिचडी, श्रीखंड, पुरणपोळ्‍या, अन्‍य पक्‍वान्‍ने यांसारखे पचायला जड पदार्थ खाणे, म्‍हणजे अग्‍नीवर अत्‍याचार करणे होय.

हृद्रोगाची (हृदयाचे विकार) लक्षणे आणि त्‍याविषयीचे गैरसमज

३० ते ३५ वयाच्‍या विशेषत: पुरुषांमध्‍ये छातीवर दडपण आल्‍यासारखे वाटणे, धडधड जाणवणे, अनामिक भीती वाटणे इत्‍यादी लक्षणे आढळण्‍याचे प्रमाण लक्षणीय आहे. कित्‍येकांना तर त्‍यांना हृदयरोग झाला असल्‍याची शंका येऊ लागते.

पचायला जड आणि हलके पदार्थ कसे ओळखावेत ?

‘जे पदार्थ खाल्‍ल्‍यावर सुस्‍ती येते किंवा शरिरात जडपणा जाणवतो, ते पदार्थ पचायला जड असतात. सर्व प्रकारची पक्‍वान्‍ने, गोडधोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ (तूप आणि ताक सोडून), कच्‍चे (न शिजवलेले) पदार्थ (उदा. कच्च्या भाज्‍या, भिजवलेली किंवा मोड आणलेली कडधान्‍ये), ही जड पदार्थांची काही उदाहरणे आहेत.

आंबे आणि फणस पावसाळ्‍यात खाऊ नयेत

पावसाळ्‍यामध्‍ये शारीरिक श्रम न करता केवळ बैठी कामे करणार्‍यांना ही फळे खाल्‍ल्‍याने भूक मंदावणे, अपचन होणे, अंग जड होणे, ताप येणे, जुलाब होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.