निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०२
‘कच्चे खाद्य तेल अग्नी (पचनशक्ती) मंद करणारे असते. असे तेल नियमित खाल्ल्याने तोंड येणे, पित्ताचा त्रास होणे, अंगावर पुरळ येणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे चटणीवर किंवा भातावर कच्चे तेल घालून खाऊ नये. तेलाचा कच्चेपणा घालवण्यासाठी लिटरभर खाद्य तेलामध्ये पाव चमचा सुंठ, हळद, ओवा किंवा जिरे यांपैकी कोणताही एक मसाल्याचा पदार्थ घालून हे तेल गरम करून थंड झाल्यावर गाळून ठेवावे.
फोडणीमध्ये कच्चे खाद्य तेल वापरल्यास चालते; कारण फोडणीतील मसाल्याच्या पदार्थांनी तेलाचा कच्चेपणा निघून जातो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |