पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०४

‘तुळशीला धार्मिक, तसेच आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने पुष्‍कळ महत्त्व असल्‍याने प्रत्‍येकाच्‍या घरी तुळस असलीच पाहिजे. तुळशीच्‍या मंजिर्‍यांमध्‍ये तुळशीचे बी असते. मंजिरी हातावर चोळल्‍यावर तिच्‍यातून मोहरीपेक्षाही लहान आकाराचे तुळशीचे बी निघते. हे बी मातीत रुजत घालून त्‍यापासून तुळशीची रोपे बनवता येतात. येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने थोड्या तरी तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan