रात्रीची झोप पूर्ण होणे महत्त्वाचे !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २०१

‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्‍हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्‍हणून दुपारी जेवल्‍यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्‍या दृष्‍टीने हानीकारक असते. रात्रीची झोप ही रात्रीच पूर्ण व्‍हायला हवी. दुपारची झोप हा रात्रीच्‍या झोपेला पर्याय नव्‍हे. दिवसभरात शरिराची जी काही झीज होते, ती रात्रीच्‍या झोपेने भरून येत असते. नेहमी रात्रीची झोप पूर्ण न झाल्‍यास ही झीज भरून येण्‍यात अडथळे निर्माण होतात आणि थकवा येणे, उत्‍साह नसणे, चिडचिड होणे, विसरायला होणे, शरीर रोडावत जाणे, यांसारखे त्रास होऊ लागतात. शरीर निरोगी असल्‍यास साधना चांगली होते. शरीर निरोगी रहाण्‍यासाठी रात्रीची झोप पूर्ण होणे आवश्‍यक आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan