चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवल्यामुळे मद्यविक्रेत्याने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची केली पूजा-आरती !

एका मंत्र्याची पूजाअर्चा करणे आणि तेही त्यांनी मद्यबंदी उठवल्यामुळे हे लज्जास्पद आणि धर्मविरोधी आहे !

चंद्रपूर – जिल्ह्यातील मद्यबंदी ६ वर्षांनंतर ८ जून या दिवशी सरकारने उठवली. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर जिल्ह्यात मद्याची दुकाने, बार आणि उपाहारगृहे चालू होणार आहेत. सरकारने मद्यबंदी उठवल्याच्या पार्श्वभूमीवर येथील एका मद्यविक्रेत्याने मंत्री वडेट्टीवार यांच्या छायाचित्राचे औक्षण करून पूजा-आरती केली आहे. (मद्यबंदी उठवल्यामुळे उद्ध्वस्त होणारे अनेकांचे संसारांचा विचार करता त्यांच्या दु:खावर हे मीठ चोळण्यासारखे नाही का ? – संपादक) 

जिल्ह्यातील मद्यबंदी उठवल्यानंतर सरकारला सर्वसामान्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे; मात्र मद्यविक्रेत्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच आमचा मद्यविक्रीचा व्यवसाय पुन्हा चालू झाला आहे. जो तुम्हाला जगवतो, तोच खरा देव असतो’, अशी येथील एका मद्यविक्रेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.