मक्केमध्ये मांस आणि मद्य यांवर असलेली बंदी चालते; मात्र मथुरेमध्ये चालत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी धर्मांधांचे कान टोचले !

उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने मथुरेमध्ये मांस आणि मद्य यांच्या विक्रीवर बंदी घातल्याचे प्रकरण

नवी देहली – मक्का येथे सिगारेट विकण्याची अनुमती नाही. ५६ इस्लामी देशांमध्ये हलाल (‘हलाल’ पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो.) वगळता अन्य कोणत्याही मांसाला अनुमती नाही. अनेक इस्लामी देशांमध्ये मद्याला अनुमती नाही; मात्र जेव्हा मथुरेचा प्रश्न येतो, तेव्हा विरोध केला जातो, असे ट्वीट लंडन येथील पाकिस्तानी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी केले आहे. उत्तरप्रदेश शासनाने मथुरेमध्ये मांस आणि मद्य यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यावरून मुसलमान संघटना आणि नेते यांनी विरोध केला आहे. त्यावर अजाकिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना हे ट्वीट केले आहे.