सांगली महापालिका क्षेत्रात लवकरच १०० ‘इ-बस’ चालू होणार !

लवकरच सांगली महापालिका क्षेत्रात ‘इ-बस’ चालू होणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठी शासन महानगरपालिकेला १०० ‘इ-बस’ देणार आहे, अशी माहिती सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

‘आदित्य एल् १’चे यशस्वी प्रक्षेपण !

भारताचे ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. चीनने त्याच्या यानावर भारतापेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’द्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनशिप या देशात विवाहसंस्था कालबाह्य झाल्यानंतरच सामान्य मानली जाईल.

सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. येथील अलंकार सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

(म्हणे) ‘देहलीत निर्माण केलेली कारंजी ही शिवलिंग नाहीत, तर कलाकृती आहे !’ – उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना

कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्‍यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् बनले सिंगापूरचे ९ वे राष्ट्राध्यक्ष !

सिंगापूर – भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षपदी बनले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या २ उमेदवारांना परातूभ केले. थर्मन यांना ७०.४ टक्के, एन्.जी. कोक संग यांना १५.७२ टक्के, तर टॅन किन लियान यांना १३.८८ टक्के मते मिळाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले. विजयानंतर थर्मन यांनी योग्य निर्णय घेतल्यासाठी … Read more

‘प्रज्ञान’ रोव्हरकडून गेल्या १० दिवसांत १०० मीटरचे मार्गक्रमण !

सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.

प्रतापगड (राजस्थान) येथे पतीनेच गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करून गावकर्‍यांसमोर १ किलोमीटर पळायला लावले !

मणीपूर येथील महिलांना निर्वस्त्र केल्याच्या घटनेवरून टीका करणारी काँग्रेस स्वतःच्या राज्यात घडणार्‍या अशा घटनांविषयी मौन बाळगते, हे लक्षात घ्या !

कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी सुखदेव गिरी यांची निवड !

कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक सुनील सोनटक्के यांनी दिली.

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.