रिक्शा भाडे, वजनमापे आणि खाद्यपदार्थांच्या तपासणीचे जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांचे निर्देश !

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज २५ ऑगस्ट बैठक झाली. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी सूचना दिल्या.

मुंबई विमानतळावरील विमानात बाँब ठेवल्याचा दूरभाष !

संपूर्ण विमानतळाची पडताळणी करण्यात आली. तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठकही आयोजित करण्यात आली. पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता वरील प्रकार समोर आला.

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी भूमिका स्पष्ट करावी ! – किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ

‘मंदिरांमध्ये भ्रष्टचार चालतो’, अशी कारणे पुढे करून मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण कालांतराने सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर मात्र आळीमिळी गूपचिळी साधली जाते !

हलगर्जीपणा चालणार नाही, एजन्सी नेमून स्वच्छता ठेवा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह  

शौचालये आणि स्वच्छतागृहे आहेत त्याचे दायित्व  त्या त्या कार्यालय प्रमुखांनी घ्यावे. कामानिमित्त येणारे अभ्यागत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी याची स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे.  

पुणे येथील ‘कबीर कला मंच’शी संबंधित कार्यकर्ती ज्योती जगताप हिचा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज !

ज्योती जगतापच्या विरोधातील पुरावे पुरेसे असून ती भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने रचलेल्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे मानले जात होते.

स्थानिक पातळीवरील जनता दरबार भरत नसल्याने नागरिकांची मंत्रालयात गर्दी !

सद्यःस्थितीत अनेक जिल्ह्यांत जनता दरबार भरतच नाहीत. त्यामुळे मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांना थेट मुंबईत मंत्रालयात यावे लागत आहे.

हिमाचल प्रदेशातील अनी येथील ५ हून अधिक इमारती कोसळल्या !

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.

शासकीय रुग्णालयांत रुग्णाची फसवणूक करून उपचारांसाठी पैसे घेतल्यास कठोर कारवाई होणार !

शासकीय रुग्णालयांत आरोग्य पडताळणी आणि उपचार करतांना जनतेची दिशाभूल किंवा फसवणूक करून रुग्णांकडून शुल्क घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी,असा आदेश राज्यशासनाने दिला

रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त आवश्यक !

अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ शिरस्त्राण (हेल्मेट) न घातल्याने होत असल्याचे दिसून येते.

नाशिक येथे ३ टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या !

तरुणींनो, टवाळखोरांच्या त्रासामुळे आयुष्य संपवण्यापेक्षा स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्यांना वेळीच प्रत्युत्तर द्या !