कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी सुखदेव गिरी यांची निवड !

१. सुखदेव गिरी यांचे अभिनंदन करतांना २. सुनील सोनटक्के, तसेच विविध मान्यवर

कोल्हापूर – प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्यशासनाने विभागीय अधिस्वीकृती समित्या ११ जुलैच्या शासन निर्णयान्वये गठित केल्या आहेत. कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक सुनील सोनटक्के यांनी दिली.

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात अध्यक्षीय निवडीसाठी कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे अशासकीय सदस्य गजानन नाईक, निखील पंडितराव, समीर देशपांडे, प्रताप नाईक, सदस्य सचिव तथा उपसंचालक सुनील सोनटक्के, सिंधुदुर्ग येथील जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, उपसंपादक रणजित पवार उपस्थित होते.