साधकांना आधार देणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अधिवक्त्या (सौ.) दीपश्री संपत जाखोटिया !

‘सौ. दीपश्री मितभाषी आहे. ती मनाने प्रेमळ आहे. मी तिच्याशी मोकळेपणाने बोलते. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त झालेल्या चंडीयागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

आसाम विशेष कृती दलाने बंगाल पोलीस आणि केरळ पोलीस यांच्यासह ‘ऑपरेशन प्रगत’ राबवून ८ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. ते रा.स्व. संघ आणि अन्य हिंदु संघटना यांच्या नेत्यांना ठार मारण्याचा कट रचत होते.

मुंबई येथील स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण प्रकल्पांना राज्यशासनाने ताकद द्यावी !

मुंबई येथील स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण प्रकल्पांना राज्यशासनाने ताकद द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी २० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर ते बोलत होते. 

राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना सत्ताधार्‍यांनी खोट्या घोषणा करण्याऐवजी राज्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर केली आहे.

संतोष देशमुख हत्येची एस्.आय.टी. आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा !

बीडमधील माजलगाव तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  घोषणा केली की, विशेष पोलीस पथकाद्वारे आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.