खारघर येथे शाळेच्या बसला आग !

आग लागण्यापूर्वीच चालकाने सर्व विद्यार्थ्यांना बसमधून उतरवल्याने सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.

नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे नवीन धोरण निश्चित !

१५ वर्षांपूर्वीच्या जुन्या धोरणांमध्ये पालट करून पूर, भूस्खलन, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याविषयीचे राज्यशासनाने नवीन धोरण निश्चित केले आहे. १२ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

धर्माधर्मांत भांडणे लावणार्‍या काँग्रेसला भारत जोडण्याची स्वप्ने पडत आहेत !

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर टीका

आतंकवादी याकूब मेमन याचे हस्तक होण्याऐवजी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे हस्तक होणे योग्य ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विरोधकांमध्ये उदासीनता आणि नैराश्य आहे. आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ, असे सडेतोड वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ सप्टेंबर या दिवशी पैठण येथे घेतलेल्या जाहीर सभेत व्यक्त केले.

गोवंडी येथील शासकीय वसतीगृहातून ६ मुलींचे पलायन !

विविध अन्वेषण यंत्रणांकडून मानवी तस्करीच्या गुन्ह्यात सोडवलेल्या, तसेच भीक मागण्याच्या कामातून सोडवलेल्या अल्पवयीन मुली या वसतीगृहात ठेवण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री प्रशासन चालवतील आणि दौरेही करतील, सुप्रियाताईंनी काळजी करू नये !- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील ‘जीवनदीप शैक्षणिक संस्थे’च्या वतीने परिसरातील कीर्तनकारांचा सत्कार सोहळा १० सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला होता.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांत प्रवचन, सामूहिक नामजप या माध्यमांतून धर्मप्रसार !

अनेक मंडळांनी विषय आवडल्याचे सांगून बहुतांश सर्वच ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांना परत प्रबोधन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

पैठण येथील सभेसाठी मुख्यमंत्र्यांवर गर्दी जमवण्याची वेळ हे महाराष्ट्राचे दुर्दैव ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथे जाहीर सभा होणार असून त्यात तालुक्यातील अंगणवाडीसेविकांना उपस्थित रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे राज्यात प्रथमच घडत आहे. आज अंगणवाडीसेविका सभेसाठी गेल्या, तर त्या अंगणवाडीतील मुलांनी काय करायचे ?

राज्यशासन नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ‘सेवा पंधरवडा’ राबवणार !

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन

शेतकर्‍यांनो, लंपी आजाराला घाबरू नका ! – अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

महाराष्ट्रात ७ सप्टेंबरपासून जनावरांसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार गुरांचे बाजार, शर्यती, जत्रा यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.