नाशिक येथे अतीवृष्टीमुळे मंदिरे पाण्याखाली !

जिल्ह्यात सलग २ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. देशातून येथे पूजेसाठी, तसेच पिंडदान करण्यासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होत आहे.

ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सकाळपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, तसेच ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले.

शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि दलाल यांची चौकशी होणार !

पोलीस कर्मचार्‍यांच्या स्थानांतरासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देणारी यंत्रणा उघडकीस आल्यानंतर शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि दलाल यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे संकेत ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी १५ सप्टेंबर या दिवशी दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ! – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल

सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी साधूंना मारहाण करणारा जमाव नेमका कोणता होता ? मुले पळवणारी टोळी ही केवळ हिंदु साधूंमध्येच कशी दिसते ? कधी हिरवी चादर घेऊन फिरणार्‍या फकिरांमध्ये कशी दिसत नाही ?

राबोडी (ठाणे) येथील वर्ष २००८ मधील दंगल प्रकरण

ठाणे शहराच्या राबोडी परिसरात नवरात्रीच्या कालावधीत २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हिंदु आणि मुसलमान यांच्या २ गटांतील समूहाने एकमेकांवर आक्रमण केले. यामध्ये काही हिंदू घायाळ झाले होते.

धुळे शहरातील श्री दक्षिणमुखी हनुमानाच्या चांदीच्या डोळ्याची चोरी

शहरातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील मूर्तीच्या चांदीच्या एका डोळ्याची चोरी करण्यात आली आहे. या वेळी अज्ञातांनी मूर्तीची विटंबनाही केली. १५ सप्टेंबरच्या रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई येथे आजपासून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त ४१५ ठिकाणी विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन !

१७ सप्टेंबरपासून ४१५ ठिकाणी विनामूल्य ‘आरोग्य शिबिरां’चे आयोजन करण्यात आले आहे, तरी नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी केले आहे.

येणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू ! – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन

देशद्रोही आणि आतंकवादाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देणारी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफझलखानवधाची जागा येणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी (३० नोव्हेंबर २०२२) खुली न केल्यास महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त ती जागा मोकळी करतील,

वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला भीषण आग !

नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश न आल्याने अग्नीशमनदलाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.

सरकारकडून गृहनिर्माण विभागाचे सर्व निर्णय रहित !

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना चपराक !