परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या सत्संगात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
या सत्संगात संतांसह साधक उपस्थित होते. साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वत:चे साधनेचे प्रयत्न आणि अनुभूती सांगत होते, त्या वेळी मला पुष्कळ आनंद अनुभवायला येत होता. या आनंदाचे प्रमाण एवढे होते की, साधक सांगत असलेल्या माहितीकडे लक्ष न जाता माझे लक्ष आनंदाकडे केंद्रित होत होते.