‘१६.१२.२०१९ या दिवशी सौंदाणे (जिल्हा नाशिक) येथील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित वसंतशास्त्री शेवाळे यांच्या भेटीच्या वेळी मी पंडितजींना नमस्कार केला. त्यानंतर ते आसंदीवरून उठले आणि मला वाकून नमस्कार केला. त्या वेळी मी त्यांना म्हणालो, ‘‘मला नमस्कार करू नका. मी आपल्यापेक्षा लहान आहे.’’ तेव्हा पंडितजी म्हणाले, ‘‘आमच्याकडे दिव्यात्मे आल्यावर त्यांचा आदर ठेवून नमस्कार करायलाच हवा. आपली एकमेकांशी आंतरिक ओळख आहे.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |