रामनाथी आश्रमातील सौ. अनघा सुधाकर पाध्ये (वय ६७ वर्षे) यांना ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सौ. अनघा पाध्ये
सौ. अनघा पाध्ये

१. कोणत्याही प्रसंगी ‘आई गं ..’ असे न म्हणता ‘प.पू. डॉक्टर’ असे आपोआप म्हटले जाणे

आपल्याला काही लागले किंवा दुखले, तर आपल्या तोंडून ‘आई गं…’ असे शब्द बाहेर पडतात. काही दिवसांपासून माझ्या लक्षात आले की, मी पुष्कळ दमले किंवा मला काही होत असतांना ‘आई गं ..’ असे म्हणण्यापेक्षा माझ्याकडून सहजच ‘प.पू. डॉक्टर’, असे म्हटले जाते.

(वेदनेच्या वेळी मी स्वतः मात्र अजूनही ‘आई गं ..’ असे म्हणतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.११.२०२१))

२. ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप आपोआप चालू होणे

‘काही दिवसांपासून मला रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास जाग येते. तेव्हा मी ‘निर्विचार’ हा नामजप करू लागते. हा नामजप चालू असतांना थोड्या वेळातच माझा ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप चालू होतो आणि मला पुन्हा झोप लागेपर्यंत हा नामजप चालूच असतो. मी प्रयत्नपूर्वक ‘निर्विचार’ हा नामजप करत असतांना माझा ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप कधी चालू होतो ?’, ते मला समजतच नाही. ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करत असतांना माझे मन स्थिर आणि शांत असते.

– सौ. अनघा सुधाकर पाध्ये (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२१)

सौ. अनघा पाध्ये