अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यावर गुन्हा नोंद !

वर्ष २०१७ मध्ये रेश्मा खान नावाच्या एका बांगलादेशी महिलेच्या पारपत्राच्या प्रकरणात गुन्हा नोंद न करण्यासाठी देवेन भारती यांनी दबाव आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देशासमोरील समस्यांवर आपल्यालाच उपाय शोधायचे आहेत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशासमोर अनेक समस्या असून त्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले आहे. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत  होते.

हिंदु राष्ट्रासाठी संघटित होणे हीच काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, राष्ट्रीय वारकरी परिषद

पू. ह.भ.प. वक्ते महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोणी (जिल्हा नगर) येथे वारकरी अधिवेशन संपन्न

नेवासे (नगर) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रह्मचारी महाराजांचे देहावसान !

११ डिसेंबर या दिवशी दुपारी संत, महंत आणि भाविक यांच्या उपस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी-प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर वैदिक पद्धतीने वेदमंत्रांच्या जयघोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळजाभवानी ट्रस्टच्या माध्यमातून जुन्नर (पुणे) येथील हबशी महालाचा विकास !

वास्तविक हिंदूंच्या मंदिरांचा निधी हा हिंदु धर्माच्या कार्यासाठीच व्यय व्हायला हवा. असे असतांना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांतील सरकारांनी केवळ हिंदूंच्या असंख्य मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती अधार्मिक गोष्टींवर उधळली आहे.

मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामासलवकरचपुन्हा प्रारंभ ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास लवकरच पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे. खोदकामाचे पूर्वीचे दर आणि आताचे दर यांत फरक असून आता नवीन दर ठरवून ते काम करावे लागेल.

चांगला पायंडा !

जीर्णाेद्धार करण्यात आलेल्या अन्य मोठ्या मंदिरांनी त्यांच्या मंदिरात अथवा मंदिर परिसरात मंदिराची माहिती देण्यासमवेत मंदिरावर झालेल्या सुलतानी आक्रमणांची माहिती दिल्यास हिंदूंचा धर्माभिमान जागृत राहील.

कराड नगरपालिकेकडून संरक्षक भिंतीच्या कामाला स्थगिती बालकाचा मृत्यू झाल्यानंतर जागी होणारी कराड नगरपालिका !

कराड नगरपालिकेनेही संबंधित ठेकेदारांनी काम करतांना नगरपालिकेची जलवाहिनी फोडून सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याविषयी पोलिसात तक्रार केली आहे.

महाबळेश्वर येथे गोरक्षकांमुळे १६ म्हशींचे प्राण वाचले !

‘अनेकदा गोरक्षकांमुळे गोवंशांचे प्राण वाचले, असे का होते’, याचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा’, असे गोरक्षकांना वाटते.