५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मुंबई येथील चि. ऋत्वी विकास सणस (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऋत्वी विकास सणस ही या पिढीतील आहे !

चि. ऋत्वी विकास सणस हिला दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘उद्या कार्तिक कृष्ण पक्ष द्वितीया (२१.११.२०२१) या दिवशी वडाळा (मुंबई) येथील चि. ऋत्वी विकास सणस हिचा तिथीनुसार २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची तिच्या आईला आणि नातेवाइकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

चि. ऋत्वी सणस
सौ. ऋतुजा सणस

१. गर्भारपण

१ अ. नामजप चालू असतांना बाळाची हालचाल जाणवणे : ‘गरोदर असतांना मला पाचव्या मासापासूनच ज्या वेळी माझा नामजप आणि साधना चालू असेल, तेवढा वेळ पोटात सतत हालचाल जाणवायची. ज्या दिवशी जप, व्यष्टी साधना होत नसेल, त्या दिवशी बाळाची हालचाल जाणवत नसे. ‘हालचाल का होत नाही ?’, असा विचार आल्यानंतर ‘माझा नामजप बंद आहे’, हे माझ्या लक्षात येत असे. नामजप चालू केला की, लगेच गर्भाची हालचाल चालू होई.

१ आ. घरी रहाता आल्याने नामजपादी उपाय होणे : आधुनिक वैद्यांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिल्यामुळे मी नोकरीवर न जाता घरीच राहिले. घरी राहून नामजपादी उपाय आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन व्यवस्थित होण्यासाठी देवाने जणू ही संधीच उपलब्ध करून दिली.

१ इ. प्रसुती कक्षात आल्यावर सहज प्रसुती होणे : प्रसुतीच्या दिवशी मी रुग्णालयात भरती झाल्यावर प्रारंभी माझा नामजप व्यवस्थित होत होता. भ्रमणभाषवर भजने आणि स्तोत्रे हळू आवाजात चालू होती. जसजसा माझा त्रास वाढून वेदना असह्य होऊ लागल्या, तेव्हा माझी अस्थिरता वाढली. ‘बाळाचा जन्म  लगेच व्हावा’, अशी माझ्याकडून प्रार्थना होऊ लागली. प्रसुतीकक्षात आल्यावर अगदी १० मिनिटांत प्रसुती झाली आणि काहीही त्रास झाला नाही. मला कृतज्ञता वाटून पुष्कळ आनंद वाटत होता. माझा विश्वासच बसत नव्हता, इतक्या सहजतेने प्रसुती झाली. तो पूर्ण दिवस मी पुष्कळ आनंदात होते आणि सतत कृतज्ञता व्यक्त करत होते.

सौ. सरस्वती बळे
सौ. स्वाती हरेर

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष

२ अ १. सात्त्विक : बालिकेचे नाव ‘ऋत्वी’ असे ठेवले. लहानपणापासूनच ऋत्वी सात्त्विक आहे. जन्मानंतर तिची त्वचा नितळ आणि तेजस्वी वाटत होती.’

– सौ. ऋतुजा विकास सणस (चि. ऋत्वीची आई), वडाळा, मुंबई.

२ अ २. ‘जन्मानंतर ती पुष्कळ शांत आणि स्थिर जाणवत होती.’ – सौ. सरस्वती नवनाथ बळे (ऋत्वीची आजी (आईची आई)), मुंबई आणि सौ. स्वाती अमित हरेर (मावशी) मुंबई

२ अ ३. शांत आणि संयमी : ‘जन्मापासूनच तिने कधी त्रास दिला नाही. ती शांतपणे खेळत असे. तिच्यावर विशेष लक्ष द्यावे लागत नाही. तिला कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी ती शांत असते. तिला इंजेक्शन दिले किंवा ती खेळतांना पडली, तरी तिचे रडणे क्षणिक असते. ती लगेच शांत होते.

२ अ ४. हसतमुख : ती सतत हसत आणि आनंदी असते. तिच्याकडे बघून प्रसन्न वाटते. तिला १०४ डिग्री ताप असतांनाही ती शांतपणे पडून हसत होती.

२ अ ५. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांचे छायाचित्र पाहून हात जोडून प्रथम ‘बप्पा’, असे म्हणणे : ती ७ मासांची असतांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला नमस्कार करण्यासाठी मी तिला कडेवर घेऊन छायाचित्राजवळ आले. जवळ येताक्षणी तिने हात जोडून ‘बप्पा’, असे म्हटल्याचे मला जाणवले. तिने त्यापूर्वी कधीही तसे केले नव्हते.

२ आ. एक ते दीड वर्ष

२ आ १. चपळता : ती साडेसहा मासांची असतांना उभी राहू लागली. तिला सगळे शिकायची पुष्कळ घाई असल्यासारखे वाटते. तिच्या सगळ्या कृती लवकर होत्या. तेव्हा ‘तिला पटकन सगळे शिकून मोठे व्हायचे आहे’, असे मला जाणवते. असे वाटते, ‘तिला ठाऊक आहे की, अजून पुष्कळ कार्य करायचे आहे. ईश्वरी राज्य स्थापन होणार आहे आणि तिला पुष्कळ सेवा करायची आहे.’

– सौ. ऋतुजा विकास सणस

आ. ‘तिचा तोंडवळा सतर्क आणि क्षात्रभाव असल्यासारखा वाटतो.’ – सौ. सरस्वती नवनाथ बळे आणि सौ. स्वाती अमित हरेर

२ आ २. संयमी, समाधानी आणि सहनशील : ‘ती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेते. मला कामानिमित्त तिला काही वेळेला वेगवेगळ्या लोकांकडे ठेवावे लागले; पण प्रत्येक वेळी ती सर्वांकडे छान राहिली. मे २०२१ मध्ये घरातील सर्वजण ‘कोरोना’मुळे आजारी असतांना तिने पुष्कळ सहकार्य केले. मी रुग्णालयात ८ दिवस होते. त्या वेळी तिलाही ताप होता. तेव्हा ती वडिलांसह शांतपणे राहिली.

२ आ ३. सात्त्विकता आणि साधना यांची आवड : तिला भजने ऐकायला आवडतात. तिला तिची दैवी बालक असलेली बहीण शर्वरी (वय ६ वर्षे ११ मास) सर्वांत अधिक आवडते. ‘शर्वरीची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के असल्याने तिच्यातील चैतन्यामुळे ऋत्वीला ती आवडत असावी’, असे मला वाटते. ती ‘देवा, माझ्यावर लक्ष ठेव’, अशी प्रार्थनाही करते. ती ‘नामजप करा’, असे बोलून आम्हाला नामजपाची आठवण करून देते.’

– सौ. ऋतुजा विकास सणस

२ आ ४. ‘ती वयाच्या मानाने मोठी आणि समजूतदार असून सतत आनंदी अन् उत्साही असते.’ – सौ. सरस्वती नवनाथ बळे आणि सौ. स्वाती अमित हरेर

३. ऋत्वीचा स्वभावदोष : हट्टीपणा.

‘देवा, आम्ही पुष्कळ न्यून पडत असतांनाही तू आम्हाला इतके भरभरून देत आहेस. तुझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे.’

– सौ. ऋतुजा विकास सणस (ऋत्वीची आई), वडाळा, मुंबई. (९.९.२०२१)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक