१. स्वप्नात ‘पतीचा दुसरा विवाह झाला आहे’, असे दिसणे आणि त्यानंतर सद्गुरु पिंगळेकाका आल्याने सर्वकाही व्यवस्थित होणे
‘८.१.२०१८ या रात्री स्वप्नात मला ‘काही कारणास्तव माझ्या पतीचा दुसरा विवाह झाला आहे’, असे दिसले. स्वप्नात मी त्यांना सांगत होते, ‘हिंदु धर्मामध्ये एकाच विवाहाला मान्यता आहे. त्यामुळे तुमचा दुसरा विवाह वैध नाही’; परंतु ते मान्य करत नव्हते. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका आले आणि सर्वकाही ठीक झाले.
२. स्वप्नात घडलेला प्रसंग पतीला सांगणे आणि त्यांनी दिलेल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे परात्पर गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटणे
दुसर्या दिवशी मी माझ्या पतीला या स्वप्नाविषयी सांगतांना म्हणाले, ‘‘माझ्या ‘भावनाप्रधानता’ या स्वभावदोषाचा लाभ अनिष्ट शक्ती घेत आहेत आणि म्हणून मला अशी स्वप्ने पडत आहेत. मी ते स्वभावदोष न्यून करण्याचा प्रयत्न करीन.’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘सद्गुरु काका तुझ्या स्वप्नात आले आणि सर्वकाही ठीक झाले. याचा अर्थ प.पू. गुरुदेवच आले, म्हणजेच ते सदैव तुझ्या समवेत असतात आणि ते प्रत्येक अडचणीतून तुला मुक्त करतील.’’ हे ऐकून मला परात्पर गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. स्वप्नात घडलेल्या प्रसंगाविषयी सद्गुरु पिंगळेकाका यांनी मार्गदर्शन करणे
नंतर मी हा प्रसंग सद्गुरु पिंगळेकाकांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘पुरुषाच्या जीवनात दोन वेळा विवाह होतो. एकदा त्याचा पत्नीशी विवाह होतो आणि दुसर्या वेळी जेव्हा तो गुरूंचा शिष्य होतो, तेव्हा त्याचा विवाह होतो. तुमच्या पतीला सांगा, ‘दुसरा विवाह, म्हणजे शिष्य बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे.’’ हे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४. प्रार्थना
‘हे गुरुदेव, ‘स्वभावदोष आणि अहं यांनी भरलेल्या या जिवाला शिकवण्यासाठी आपण पुनःपुन्हा मला संधी देत आहात’, याविषयी माझ्या मनात अखंड कृतज्ञताभाव राहू द्या आणि आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न आपणच माझ्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या कोमल चरणी अत्यंत दीनभावाने प्रार्थना करते.’
– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी (८.१.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |