रामनाथी आश्रमात मृत्युंजय याग झाल्यावर सलग ३ रात्री शिवाशी संबंधित स्वप्ने पडणे आणि त्यामुळे आनंद मिळून उत्साह वाढणे
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘मृत्युंजय याग’ झाला. याग चालू असतांना मी डोळे मिटल्यावर मला ध्यानावस्थेत बसलेला शिव दिसला. याग झाल्यानंतर सलग ३ – ४ रात्री मला शिवाशी संबंधित स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमध्ये मला ‘शिव आणि शिवाशी संबंधित दृश्ये दिसली.