उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कृष्णप्रिया किशोर दुसाने ही एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. पंधरा दिवसांची कृष्णप्रिया गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात शांतपणे रहाणे
‘वर्ष २०१२ मध्ये चि. कृष्णप्रियाचा जन्म झाला आणि १५ दिवसांनीच गुरुपौर्णिमा होती. त्या वेळी तिची आई तिला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला घेऊन आली होती. तिथे ती दिवसभर आनंदात राहिली. तिने कोणताच त्रास दिला नाही. तेव्हा साधक म्हणाले, ‘‘अरे वा ! ही देवाला भेटायला आली आहे का ?’’
२. आईला सनातनच्या सत्संगात जाण्यास सांगणे
कृष्णप्रिया ५ वर्षांची असतांना जळगाव येथे आमच्या घराजवळ सनातन संस्थेचा सत्संग असायचा. सत्संग घेणार्या ताईने कृष्णप्रियाच्या आईला बोलावले. तेव्हा कृष्णप्रिया आईला म्हणाली, ‘‘आई, तू सत्संगाला जा. मी घरी थांबते.’’ हे ऐकून तिच्या आईला आश्चर्य वाटले. एवढ्या लहान वयात ‘आईने सत्संगाला जावे’, असे तिला मनापासून वाटले.
३. धर्माचरणाची आवड
कृष्णप्रियाला कुंकू लावण्याचे महत्त्व समजल्यावर ती प्रतिदिन शाळेत कुंकू लावून जायला लागली. ती तिच्या वर्गातील मुलींनाही कुंकू लावण्याचे महत्त्व सांगते. तिला हातात बांगड्या आणि पायात पैंजण घालायला पुष्कळ आवडते.
४. भाषाभिमान
एकदा तिच्या वर्गशिक्षिकेने भ्रमणभाषवर ‘हॅलो’, असे म्हटले. तेव्हा कृष्णप्रिया त्यांना म्हणाली, ‘‘बाई, भ्रमणभाषवर बोलतांना आपण ‘नमस्कार’, असे म्हटले पाहिजे.’’
५. प्रेमभाव
साधक घरी आल्यावर ती त्यांना प्यायला पाणी देते आणि त्यांची विचारपूस करते. मी देवद आश्रमात वास्तव्यास असतो. ती मला भ्रमणभाष करते आणि ‘सर्व साधक कसे आहेत ? त्यांना माझा नमस्कार सांगा’, असे आवर्जून सांगते. तेव्हा तिच्यातील आदरयुक्त प्रेमभाव लक्षात येतो.
६. उत्तम स्मरणशक्ती
६ अ. तिला एकदा सांगितलेले सूत्र पुन्हा सांगावे लागत नाही. शाळेत एकदा शिकवलेले तिच्या लक्षात रहाते.
६ आ. देवाचे स्मरण करून प्रार्थना केल्यानंतर भाषण आपोआप म्हणता येणे : तिने शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत लोकमान्य टिळक यांच्याविषयी केलेले भाषण सर्वांना आवडले आणि सर्वांनी तिचे कौतुकही केले. त्या कार्यक्रमानंतर मी तिला सहज विचारले, ‘‘हे भाषण तुझ्या लक्षात कसे राहिले ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी देवाचे स्मरण करून प्रार्थना केली आणि माझ्याकडून भाषण आपोआप म्हटले गेले.’’
७. सेवेची आवड असल्याने वडिलांसमवेत सेवेला जाणे
तिला सेवा करायला आवडते. दिवाळीत आकाशकंदिल बनवण्याची सेवा असते. त्या सेवेला तिचे बाबा जातात. तेव्हा तीही त्यांच्यासमवेत आवडीने सेवेला जाते.
८. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव
८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन ग्रंथ मैत्रिणींना दाखवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती तिचा पुष्कळ भाव आहे. ती खेळायला आलेल्या मैत्रिणींना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन ग्रंथ’ आणि स्मरणिका दाखवते. त्या वेळी ‘हे आमचे परात्पर गुरु डॉक्टर आणि हा आमचा आश्रम’, असे सांगते.
८ आ. ‘मी आश्रमात जाऊन साधना करणार आहे’, असेही ती सांगते. हे सांगतांना तिचा तोंडवळा पुष्कळ आनंदी असतो.
८ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडे पहात आहेत’, असे कृष्णप्रियाला वाटणे : वर्ष २०१९ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये कृष्णप्रियाची लहान बहीण कु. योगिता दुसाने (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के (वय ६ वर्षे) हिची गुणवैशिष्ट्ये लिहून आली होती. त्या वेळी कृष्णप्रिया मला म्हणाली, ‘‘काका, परम पूज्यांनी योगिताचे छायाचित्र पाहिले असेल ना ? ते मला कधी पहातील ?’’ मी तिला सांगितले, ‘‘ते आपल्याला नेहमी पहात असतात.’’ ती म्हणाली, ‘‘हो का ? मलाही असेच वाटते की, ते नेहमी मला पहात असतात.’’
८ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीची ओढ निर्माण होणे : १३.५.२०२० आणि १५.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मादिनानिमित्त ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पाहिल्यावर तिला परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची ओढ निर्माण झाली. ती तिच्या बाबांना म्हणाली, ‘‘बाबा, आपण परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला कधी जायचे ?’’
९. स्वभावदोष
हट्टीपणा, राग येणे.
– श्री. राजेंद्र दुसाने (कु. कृष्णप्रियाचे काका), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |