‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘मृत्युंजय याग’ झाला. याग चालू असतांना मी डोळे मिटल्यावर मला ध्यानावस्थेत बसलेला शिव दिसला. याग झाल्यानंतर सलग ३ – ४ रात्री मला शिवाशी संबंधित स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमध्ये मला ‘शिव आणि शिवाशी संबंधित दृश्ये दिसली. त्यातील एका स्वप्नात ‘आमच्या घरी भूमी खणतांना फणा केलेल्या नागाची सोन्याची मूर्ती सापडली’, असे दिसले. ती मूर्ती चमकत असून तिच्याभोवती मला पिवळा प्रकाश दिसला.
यागाच्या वेळीच नाही, तर एरव्हीही मला शिव स्वप्नात दिसतो, कधी शिवपिंडीही दिसते. या स्वप्नांचा मला त्रास होत नाही. उलट स्वप्न पडल्याच्या दुसर्या दिवशी आनंद मिळून उत्साह वाढतो.’
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१९)
(१. ज्याने एखाद्या जन्मात ज्या देवतेची उपासना केली असेल, तो देव काही जणांच्या स्वप्नात येतो. २. ज्याला ज्या देवतेची उपासना आवश्यक असेल, तो देव काही जणांच्या स्वप्नात येतो. – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |