परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्‍या जनतेला राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्‍या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !

देहली येथे ‘हज हाऊस’ बांधण्याला हिंदुत्वनिष्ठ आणि गावकरी यांनी आंदोलन करून दर्शवला विरोध !

देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्‍या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?

टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा यांना भालाफेकीमध्ये सुवर्णपदक !

भारताच्या आतापर्यंतच्या ऑलिंपिकमधील सहभागाच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने भालाफेकीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यांनी ही कामगिरी केली आहे.

 पुणे येथे रेल्वेच्या अवैध तिकिटविक्रीसाठी वापरल्या जाणार्‍या प्रणालीचे मूळ पाकिस्तानात

मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

धर्म लपवून हिंदु युवतीशी लग्न करणार्‍या धर्मांधाला अटक

देशभरात धर्मांध युवकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी लाखो हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त होत असतांना त्याकडे राष्ट्रीय स्तरावर दुर्लक्ष होणे, दुदैवी आहे ! अशा अनेक समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

हिंदु युवतीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदु युवतींना फूस लावून त्यांच्याशी लग्न करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करून उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याचे सार्थक करावे !

‘बेस्ट बस’ आणि ‘लोकल’ यांच्या प्रवासासाठी एकच पास किंवा तिकिट यांचे नियोजन चालू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

इलेक्ट्रिक बस प्रदूषण न करणारी आणि पर्यावरणपूरक आहे. वर्ष २०२१ पर्यंतचा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. बेस्ट बस आणि लोकल प्रवास यांसाठी एकच पास किंवा तिकीट चालावे, याचे नियोजन करण्यात येत आहे

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे पोलीस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न !

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे अन्यायकारक स्थानांतर केल्याचा आरोप करत शहर वाहतूक शाखेतील चालक विजय शंकरराव माळी यांनी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांद्वारे प्रसिद्ध केला होता.

मुंबईत भर रहदारीत वाहन अडवून चारचाकीतील भ्रमणसंगणक चोरला !

अशा टोळ्यांना पकडून कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक 

‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटल्यामुळे काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन करून निषेध !

‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक येथे केंद्र सरकारने ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटून ते मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केल्याने आंदोलन करून निषेध केला.