-
लव्ह जिहाद !
-
भावाच्या साहाय्याने मध्यप्रदेश पोलिसांकडून युवतीची सुटका
देशभरात धर्मांध युवकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी लाखो हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त होत असतांना त्याकडे राष्ट्रीय स्तरावर दुर्लक्ष होणे, दुदैवी आहे ! अशा अनेक समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – संपादक
कानपूर (उत्तरप्रदेश) – ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या एका हिंदु युवतीला तिच्या भावाच्या साहाय्याने मध्यप्रदेश पोलिसांनी कह्यात घेतले. धर्मांधाने त्याचा धर्म लपवून युवतीशी लग्न केले होते. युवतीची साक्ष नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
१. मसवानपूर (उत्तरप्रदेश) येथील हिंदु युवती ‘फेसबुक’च्या माध्यमातून इंदूरमधील धर्मांध युवकाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्याने स्वत:चा धर्म लपवून युवतीशी प्रेमसंबंध निर्माण केले.
२. गेल्या २८ जानेवारी २०२० या दिवशी युवतीने धर्मांधासमवेत पलायन केले. इंदूर येथे दोघांचा निकाह झाला. तेव्हा धर्मांधाचे खरे स्वरूप तिच्या लक्षात आले. याच काळात युवतीच्या नातेवाइकांनी युवती बेपत्ता झाल्याविषयी कल्याणपूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
३. विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर युवतीच्या भावाला ती इंदूर येथे असल्याचे समजले. त्यानंतर त्याने पोलिसांच्या साहाय्याने तिची सुटका केली. त्यानंतर तिला कल्याणपूर येथे आणण्यात आले. युवतीची साक्ष नोंदवल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे कल्याणपूर पोलिसांनी सांगितले.