बलिया (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’ !
हिंदु युवतींना फूस लावून त्यांच्याशी लग्न करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा करून उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याचे सार्थक करावे ! – संपादक

बलिया (उत्तरप्रदेश) – हिंदु युवतीला बुरखा घालून येथील न्यायालयात नोंदणी पद्धतीने लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्या दिलशाद सिद्दिकी या धर्मांधाला लोकांनी पकडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला; परंतु पोलिसांनी युवतीला सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलशादला अटक केली.
युवतीचे वडील रिक्शाचालक आहेत. बिल्थरारोड येथे रहाणार्या युवतीचा ३ मासांपूर्वी स्वजातीय युवकाशी विवाह झाला होता. त्यानंतर लवकरच ती माहेरी परत आली होती. काही दिवसांपूर्वी ती अचानक घरातून बेपत्ता झाली. याविषयी नातेवाइकांनी उभांव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. हेही प्रकरण ‘लव्ह जिहाद’शी संबंधित असल्याचे पोलिसांना वाटते; परंतु युवतीचे नातेवाईक आणि युवती यांनी तसा आरोप केला नाही. अशा स्थितीत पोलिसांनी युवतीला पळवून नेऊन धर्मांतर केल्याप्रकरणी प्रकरण नोंदवले आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा