आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जण निर्दोष मुक्त

या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे आंदोलकांकडून उल्लंघन झाले होते. यामुळे पोलिसांनी आमदार भोसले आणि समर्थकांवर गुन्हा नोंद केला होता.

गोरेगाव (जिल्हा हिंगोली) येथे निवडणुकीच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी ६० जणांवर गुन्हा नोंद  

‘तू आमच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक का लढवतो ?’ या कारणावरून ६० जणांनी मारहाण केली.

पवई (मुंबई) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण

आमदार राम कदम यांनी आरोपींना सोडण्याची विनंती केल्यामुळे टीका

उद्गार प्रकाशनाच्या वतीने ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ हे पुस्तक विक्रीस उपलब्ध

नामांकित इतिहास संशोधक पु.ना. ओक यांनी लिहिलेल्या या मराठी आवृत्तीचे मूल्य ३२० रुपये असून, इंग्रजी आवृत्ती ३७५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महिला या ऊर्जेचा स्रोत असल्याने त्यांना कोणीही न्यून लेखू नये ! – माजी केंद्रीय मंत्री उमा भारती

महिला या ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यांना कोणीही न्यून लेखू नये. देशातील कोणत्याही महिलेला पुरुषासमोर पैशांसाठी हात पसरावा लागणार नाही, अशी आर्थिक स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

कोल्हापुरात पोलिसांना पुढील काळात १५ दिवसांची सक्तीची रजा !

सततच्या ताणामुळे मानसिक स्थिती तणावग्रस्त असते. त्याचा परिणाम नियमित कामकाजावर होत आहे. त्यात कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. याकरीता वर्षातील १५ दिवस अशी रजा सक्तीने कर्मचार्‍यास घ्यावी लागणार आहे.

नवीन महाविद्यालय चालू करतांना त्याच्या मान्यतेसाठी ५० सहस्र रुपये मागितल्याचा आरोप !

पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळी झालेल्या आरोपामुळे खळबळ !

‘बार्क’चे माजी अधिकारी दासगुप्ता मुख्य सूत्रधार ! – पोलिसांचा आरोप

मनोरंजन वाहिन्या आणि क्रीडा वाहिन्या यांनीही टी.आर्.पी. वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

हिंदुद्वेषाची अडगळ !

हिंदु समाजात घडणार्‍या अयोग्य गोष्टी, अपप्रकार, दांभिकता सांगू नये, असे अजिबात नाही; पण ते सांगण्याची लेखकाची पद्धत अशी होते की, कुणाही युवा पिढीतील वाचकाला ‘हिंदु धर्मच वाईट आहे’, असे सहज वाटू शकेल. त्याला आक्षेप आहे आणि राहील.

मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महोत्सवाला आजपासून प्रारंभ

मांगोरहिल येथील श्री अय्यप्पा मंदिरात १३ ते २० जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.