उद्गार प्रकाशनाच्या वतीने ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ हे पुस्तक विक्रीस उपलब्ध

सांगली, १२ जानेवारी (वार्ता.) – पुणे येथील उद्गार प्रकाशनाच्या वतीने ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ हे पुस्तक विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नामांकित इतिहास संशोधक पु.ना. ओक यांनी लिहिलेल्या या मराठी आवृत्तीचे मूल्य ३२० रुपये असून, इंग्रजी आवृत्ती ३७५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे पुस्तक मागवल्यास शून्य ‘कुरियर’ मूल्यात ते घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यांना पुस्तक हवे आहे ते ‘क्यूआर कोड’ ‘स्कॅन’ करून ९३७३४५२९०७ या क्रमांकावर पत्ता पाठवावा किंवा पुस्तकाची नोंदणी या क्रमांकावर करावी, असे आवाहन श्री. सुजित भोगले यांनी केले आहे.

१. ताजमहाल हा तेजोमहाल अर्थात चंद्रमौलीश्‍वर शिवाचे मंदिर आहे, हे सिद्ध करणारे पुस्तक कै. पु.ना. ओक यांनी वर्ष १९६५ मध्ये लिहिले आणि सर्वत्र खळबळ उडाली. स्वतःला इतिहासातील तज्ञ म्हणवणारे पर्शियन, अरेबिक आणि उर्दू मधील भाषालेखक उसने अवसान आणून त्यांना खोटे म्हणायला सरसावले.

२. त्यामुळे असा ज्वलंत सत्य इतिहास पुढे आणणारे पुस्तक उद्गार प्रकाशन पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहे.

३. याची बांधणी उत्तम दर्जाची असून, उत्कृष्ट छायाचित्रे आणि त्याचे विस्तृत विवेचन केले आहे.

या पुस्तकात पु.ना ओक यांनी दिलेले काही पुरावे

१. कळसावर सर्वात वरती चंद्रकोर आहे. ही चंद्रकोर शिवाने स्वत:च्या मस्तकी माळलेल्या चंद्रकोरीचे प्रतिक आहे. म्हणूनच तो चंद्रमौलीश्‍वर आहे. त्या चंद्रकोरीच्या वर पाण्याने भरलेला कलश आहे. त्या कलशातून आंब्याची पाने डोकावत आहेत आणि त्या आंब्याच्या पानांच्यावर नारळ ठेवला आहे. जगातील प्रत्येक हिंदूच्या घरी पूजा करतांना आपण हा कळस ठेवतो. त्यामुळे हे हिंदु संस्कृतीचे प्रतिक आहे, हे सिद्ध होते.

२. अरब जेथून आले, तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. मंदिर घडवणारे पर्शियन होते, असे मानले तरी पर्शियात आंबे नाहीत ना तिथे नारळ आहेत. त्यामुळे हे १०० टक्के हिंदु प्रतिक आहे.