महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही ! – पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार

राज्यातील विविध जिल्ह्यांत पक्ष्यांची पडताळणी केली असून राज्यात बर्ड फ्लू अस्तित्वात नाही, असे विधान पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. ठाणे येथे १६ पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूची शंका निर्माण झाली होती; मात्र त्या पक्ष्यांची बर्ड फ्लूची केलेली पडताळणी नकारात्मक आली.

महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरतीचा आदेश रहित

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुधारित आदेश काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय शासनाने घेतला; मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया रहित केली.

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मनोज देधिया याला पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. न्यायालयाने देधिया याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

कळंबा कारागृहातून पुन्हा २ भ्रमणभाष, सीमकार्ड जप्त; ‘मकोका’तील ५ जणांवर गुन्हा नोंद  

ज्या ठिकाणी गुन्हेगारी वृत्तीत पालट व्हावा म्हणून शिक्षेसाठी गुन्हेगारांना ठेवले जाते त्या ठिकाणीच जर भ्रमणभाष, पेनड्राईव्ह अशा गोष्टी सापडत असतील, तर कारागृह यंत्रणा किती कुचकामी आहे, हेच यातून सिद्ध होते.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी अडचणी त्वरित दूर कराव्यात ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या आणि वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी या दिवशी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान शाळेच्या भूखंडावरील आरक्षण उठवण्याचा प्रस्ताव महासभेत फेटाळणार ! – युवराज बावडेकर

श्री. बावडेकर पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेजवळील भूखंडावरील आरक्षण उठवण्यास भाजपचा विरोधच आहे. महासभेसमोर हा विषय आल्यास यावर सखोल चर्चा होऊन तो फेटाळण्यात येईल.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमीला निधी अर्पण

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास अर्पण निधी म्हणून ११ सहस्र १११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

हेमंत नगराळे हे वर्ष १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९८ ते २००२ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्येही काम केले. प्रारंभी मुंबई येथे, त्यानंतर देहली येथे उपमहासंचालकपदाचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

शेळ-मेळावली येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून निषेध

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून ‘गोवा शासनाने या आंदोलकांविरुद्ध केलेली कृती अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे’, या शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘भारताकडून लडाखमधील पँगाँग तलावाजवळील नैसर्गिक वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न !’

भारत नाही, तर चीन येथील वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने येथील भाग सैन्य छावणीमध्ये परावर्तित केला आहे. येथे त्याने बंकर आणि ‘रडार स्टेशन’ उभारले आहेत.